शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (09:41 IST)

समस्या दूर झाली, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पूर्वीप्रमाणे काम करू लागले

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने सोमवारी रात्री जगभरात अचानक काम करणे बंद केले. ही समस्या सोमवारी रात्री 9 च्या सुमारास समोर आली. आता हे सर्व मेसेजिंग अॅप्स पुन्हा काम करू लागले आहेत, परंतु ते काम न करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
 
आउटेज दरम्यान, लोक संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकले नाहीत. आऊटेज ट्रॅकिंग कंपनी DownDetector.com च्या मते, 80,000 पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपवर आणि 50,000 पेक्षा जास्त फेसबुकवर तक्रारी दाखल केल्या. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्ते न्यूज फीड अपडेट करू शकले नाहीत, तर व्हॉट्सअॅप वापरकर्ते कोणतेही संदेश पाठवू शकले नाहीत. व्हॉट्सअॅप वर 5xx आणि फेसबुक मध्ये डोमेन नेम सिस्टीम एरर दाखवत होता.
 
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या तिन्हीचे मालक फेसबुक आहे. सेवा बंद झाल्यानंतर फेसबुकने म्हटले आहे की काही लोकांना अॅप वापरण्यास त्रास होत आहे. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच ही समस्या दूर होईल. त्याचवेळी, सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्हाला माहित आहे की यावेळी काही लोकांना अडचणी येत आहेत. आम्ही गोष्टी पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि आपल्याला शक्य तितक्या लवकर कळवू. आपल्या संयमाबद्दल आभार मानतो.
विशेष म्हणजे भारतात व्हॉट्सअॅपचे 53 कोटी, फेसबुकचे 41 कोटी आणि इंस्टाग्रामचे 21 कोटी वापरकर्ते आहेत.