1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified बुधवार, 29 एप्रिल 2020 (11:46 IST)

दरररोज 5GB डेटा मोफत, फ्री-ऑफ-कॉस्ट [email protected] भन्नाट ऑफर

टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने लॉकडाउनमुळे ब्रॉडबँड युजर्ससाठी आणलेली आपली ‘वर्क फ्रॉम होम’ ऑफर 19 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 10Mbps च्या स्पीडने 5 जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे हा प्लान पूर्णतः मोफत आहे. डेटामर्यादा संपल्यानंतर स्पीड 1Mbps चा मिळेल.
 
या प्लानसाठी कंपनी ब्रॉडबँड युजर्सकडून एक रुपयाही आकारत नाही. फ्री-ऑफ-कॉस्ट [email protected] प्लासाठी डिपॉझिट किंवा इंस्टॉलेशन चार्ज देण्याचीही गरज नाही. पण ही ऑफर आधीपासून बीएसएनएल ब्रॉडबँडचे ग्राहक असलेल्यांनाच लागू आहे. हे ग्राहक केवळ 1800-345-1504 या नंबरवर फोन लावून ग्राहक या शानदार ऑफरचा लाभ घेवू शकतात. 
 
5 जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतरही कंपनीने एफयूपी मर्यादा ठेवलेली नाही. बीएसएनएलच्या या प्लॅनचा फायदा सध्या लँडलाइन कनेक्शन असलेल्यांनाच मिळेल. नवीन कनेक्शन घेणाऱ्या युजर्सना याचा फायदा मिळणार नाही’, असे बीएसएनएलकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.