बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 21 जून 2019 (14:42 IST)

बीएसएनएलचा नवीन स्वस्त प्लॅन 'अभिनंदन 151', अमर्यादित कॉलिंगची सोय

सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी नवीन प्लॉन 'अभिनंदन 151' लाँच केला आहे.

बीएसएनएलने गुरुवारी येथे एका बयानात सांगितले आहे की या प्लॉनला 90 दिवसांच्या प्रमोशनल कालावधीसाठी लाँच करण्यात आला आहे. या प्लॉनमध्ये दिल्ली आणि मुंबई समेत रोमिंगमध्ये देखील कुठल्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. 24 दिवसांची वैधता असणार्‍या या प्लॉनमध्ये रोज 1 जीबी डाटा आणि 100 एसएमएस कुठल्याही नेटवर्कसाठी मोफत मिळतील.
 
हा प्लॉन नवीन ग्राहकांसमवेत या प्लॉनमध्ये मायग्रेट होणार्‍या ग्राहकांवर देखील लागू होईल. या प्लॉनमध्ये येणार्‍या सर्व ग्राहकांची वैधता वाढवण्यासाठी वेगळ्या रिचार्ज वाउचरची गरज नसणार. ग्राहकांना मिळणार्‍या फ्रीबीज यथावत राहणार आहे.