सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2019 (16:34 IST)

शनिवार वाडा परिसरात स्टॅम्प घोटाळा आता तेलगी नाही तर यांनी केला हा घोटाळा

पुणे येथील प्रसिद्ध असलेल्या शनिवार वाडयाजवळील लाल महालासमोर असलेल्या कमला कोर्ट बिल्डींगमधून विश्रामबाग पोलिसांनी तब्बल 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचे 100 आणि 500 रूपयांचे स्टॅम्प पेपर जप्‍त केले आहे. या गंभीर प्रकरणी तिघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार करिता शिक्‍का तयार करून स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून हा घोटाळा करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. चिन्मय सुहास देशपांडे (26), सुहास मोरेश्‍वर देशपांडे आणि सुचेता सुहास देशपांडे (54, तिघे रा. 183, कसबा पेठ, पारसनीसवाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विजय विश्‍वनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. 
 
देशपांडे दाम्पत्य हे कोषागार कार्यालयातून स्टॅम्प काढून नंतर त्यावर बनावट शिक्क्याचा वापर करत होते, ते स्टॅम्प पेपर ब्लॅकने विकत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त माहिती कळली होती. या माहितीची सत्यता तपासली गेली त्यानंतर पोलिस उपायुक्‍त सुहास बावचे, विश्रामबाग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ सुनिल कलगुटकीकर आणि त्यांच्या पथकाने कमला कोर्ट बिल्डींगमधील देशपांडे यांच्या शनिवार पेठेतील पर्वती माता सोसायटीतील शॉप नंबर 1 आणि बुधवार पेठेतील देशपांडे व्हेंडरच्या दुकानावर छापा टाकला होता. पोलिसांनी येथून 100 , 500 रूपये किंमतीची 67 लाख 30 हजार रूपयांची स्टॅम्प पेपर जप्‍त केली आहेत. यामध्ये देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने आपआपसात संगनमत करून कुठलाही अधिकार नसताना वरिष्ठ कोषागार अधिकारी, प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार असा शिक्‍का तयार केला होता. कोषागार कार्यालयातून स्टॅम्प पेपर बाहेर काढताना हा शिक्‍का मारला जातो. देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून टॅम्प पेपरची विक्री केली आहे. आरोपींनी एवढया मोठ्या रक्‍कमेचे स्टॅम्प पेपर कोठुन आणले याबाबत तपास चालु आहे.त्यामुळे पुणे पुन्हा चर्चेत आले असून हा नवीन स्टॅम्प घोटाळा तर नाही ना ? याचे उत्तर सध्या पोलिस तपासात आहेत.