गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

केबल सेवेच्या नवीन नियमांना मुदतवाढ

दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या डीटीएच आणि केबल सेवेसंबंधीच्या नवीन नियमांना तूर्त मुदतवाढ देत आता ३१ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे काही निवडक चॅनेल पाहण्यासाठी संपूर्ण पॅकेज विकत घेण्याची यापुढे गरज पडणार नाही. अनेक ग्राहकांनी ट्रायच्या नव्या नियमांचे स्वागत केले होते. पण महाराष्ट्रातील केबल चालकांनी या नियमावलीला विरोध केला. यामुळे ग्राहकांचा टेलिव्हिजन मनोरंजनावरील मासिक खर्च वाढणार असल्याचे केबलचालकांचे म्हणणे होते.

या बदलाला विरोध करण्यासाठी त्यांनी गुरुवारी संध्याकाळी ७ ते १० या वेळेत राज्यातील केबलसेवा बंद ठेवली होती. ग्राहकांना होणारे बदल नीटपणे समजून घेण्यासाठी आणि योग्यपणे त्यांना त्यांचा निर्णय घेता यावा, यासाठी या नियमांच्या अंमलबजावणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.