गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

केबलचालकांचा ब्लॅकआऊटचा इशारा, आज तीन तास केबल बंद

केबलचालकांनी ब्लॅकआऊटचा इशारा दिल्याने त्याविरोधात इशारा देणारी ट्रायची यंत्रणाच ब्रॉडकास्टर्सच्या पायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत केबलचालकांनी प्राइम टाइममध्ये गुरूवारी तीन तास केबल बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेतला. ट्रायच्या निर्णयांना आणि काही वाहिन्यांना विरोध करताना त्यांनी पुन्हा ग्राहकांचीच कोंडी करत त्यांना वेठीला धरण्याचा पवित्रा उचलला आहे.
 
ट्रायचे नियम ग्राहकांसह केबल व्यावसायिकांसाठी जाचक आहेत. त्याचा लाभ केवळ ब्रॉडकास्टर्सना होईल. ग्राहकांना दरवाढीला सामोरे जावे लागेल, असा आरोप बुधवारच्या बैठकीत केबल आॅपरेटर अ‍ॅण्ड ब्रॉडकास्टर असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. अनील परब यांनी केला आणि ट्रायच्या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी सायंकाळी ७ ते १० पर्यंत प्रसारण बंद ठेवून ब्लॅक आऊट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.