शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

औषधे घेण्याची आठवण करुन देणारे अॅप तयार

वयस्क लोकांना प्रसंगी नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. मात्र कधी-कधी त्यांना वेळच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेणे आठवणीत राहत नाही. यामुळे त्यांची औषध घेण्याची वेळच बिघडते.
 
मात्र आता असे होणार नाही. कारण औषधे घेण्याचा दिनक्रम आठवण करुन देणारे अॅप आता विकसित झाले आहे. आजी-आजोबांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे नवे मोबाईल अॅप्लिकेशन अॅप म्हणजेच दवाई दोस्त या नावाने तयार करण्यात आले आहे की. ते घणातील वयस्क लोकांना औषधे घेण्याची नियमितपणे आठवण करुन देते. यामुळे ते ठरल्या वेळेत औषधे घेतल्याशिवाय राहूच शकत नाहीत. हे अॅप आर्यमन कुंजरु यांनी तयार केले आहे.
 
कुंजरु यांच्या घरातही वयस्क सदस्य आहेत. या लोकांना येक्नॉलॉजी आणि टचस्क्रीन वापरणे अत्यंत आव्हानात्मक होते. यामुळे कुंजरु यांना आपल्या घरातील लोकांना औषधे घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे अॅप तयार करण्याची प्रेरणा मिळाली. उल्लेखनीय म्हणजे दवाई दोस्त हे अॅप औषधाची वेळ होताच व्हाईस नोटिफिकेशनच्या माध्यामातून वयस्कांना औषध घेण्याची आठवण करुन देते.