1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (16:42 IST)

डेल कर्मचार्‍यांना काढण्याच्या तयारीत

अनेक मोठ्या कंपन्या टाळे ठोकत आहेत. आता डेलही या यादीत सामील होणार आहे. याबाबतचा अहवाल आला आहे. डेल 6650 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. ही छाटणी त्याच्या ग्लोबल वर्कफोर्स मध्ये केली जाणार असल्याचे वृत्त आहे.  
 
ब्लूमबर्गने याबाबतचे वृत्त दिले आहे. कंपनीने यापूर्वी नियुक्ती गोठवली होती. याशिवाय प्रवासी निर्बंधही लादण्यात आले आहेत. परंतु, कंपनीच्या खर्चात कपात करण्यासाठी हे पुरेसे नाही, असे दिसते. यामुळे कंपनी आता टाळेबंदीचे नियोजन करत आहे. 
 
 2020 मध्येही कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, सध्याच्या छाटणीचा सर्वाधिक फटका कोणत्या विभागाला बसणार आहे,  हे या अहवालात स्पष्ट झालेले नाही. या अहवालात एका प्रवक्त्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, कंपनी नोकऱ्या कमी करण्याकडे संधी म्हणून पाहत आहे.  
 
या कपाती नंतर सुमारे 39000 कर्मचारी डेलमध्ये राहतील. मार्च 2022 च्या फाइलिंगनुसार, कंपनीचे एक तृतीयांश कर्मचारी यूएसमध्ये राहतात डेलने या टाळेबंदीबद्दल पुष्टी केली आहे परंतु नोकरीतील कपातीबद्दलच्या संख्येबद्दल माहिती दिली नाही. 
 
Edited By - Priya Dixit