बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मे 2019 (17:04 IST)

काय आपल्याला माहित आहे Netflix चे हे खास फीचर?

* स्मार्ट डाउनलोड्स - आपल्यापैकी बर्याच लोकांना नेटफिक्सवर डाउनलोड फीचरबद्दल माहितच असेल, यात आपण आपलं आवडतं कंटेंट डाउनलोड करू शकता आणि नंतर आपण कुठेही, बस, मेट्रो, रेल्वे किंवा फ्लाइटमध्ये कधीही ते ऑफलाइन मोडवर पाहु शकता. परंतु काय आपल्याला स्मार्ट डाउनलोड बद्दल माहित आहे? अलीकडे सादर केलेल्या या फीचरमुळे कंटेंट दाखविणे अधिक सोयीस्कर बनवते. आपण 'स्मार्ट डाउनलोड्स' निवडल्यास नेटफ्लिक्स आपोआप त्या शोचे पुढील एपिसोड डाउनलोड करतो जे आपण पाहत आहात आणि जो एपिसोड आपण पाहुन चुकले आहात त्याला तो डिलीट करेल. आपण फक्त पहा, आणि Netflix सर्व कार्य करेल.
 
* Instagram वर शेअर करणे - इंस्टाग्राम नवीन फेसबुक बनले आहे, नेटफ्लिक्स इंस्टाग्रामवर आपण पहात असलेला चित्रपट किंवा शोचे रोमांच आणि मजा शेअर करण्याची आपली गरज समजून घेतो. नेटफ्लिक्ससह, वापरकर्ते Android आणि iOS मोबाइल फोन दोन्हींवर थेट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर टायटल शेअर करू शकतात. वापरकर्ते कस्टम आर्ट, कॅप्शन आणि बरेच काही जोडू शकतात. स्टोरी 24 तासापर्यंत टिकेल आणि Netflix Apps वर टायटल पेजवर परतल्यावर 'वॉच ऑन नेटफ्लिक्स' लिंक प्रदान केली जाईल. 
 
* प्रोफाइल्स - आपण नेटफिक्स वापरत असल्यास आणि मुलांना फोन देताना आपण घाबरत असाल की आपले मुलं कुठेही व्हिडिओ बघून काही चुकीचे शिकत तर नाहीये. हे टाळण्यासाठी नेटफ्लिक्सने प्रोफाइल नावाचा पर्याय दिला आहे. यात एक किड्स नाव असा प्रोफाइल आहे. जेव्हाही आपण आपल्या मुलाला नेटफिक्सचा उत्तम व्हिडिओ दर्शवू इच्छित असल्यास त्यात किड्स प्रोफाइल अॅक्टिवेट करावे. कंपनीने मुलांकडे विशेष लक्ष देत, त्यात काही विशेष शिक्षित करणारे व्हिडिओ सामील केले आहे. स्मार्टफोनच्या अॅपमध्ये कि़ड्स प्रोफाइल अॅक्टीवेट करण्यासाठी खाली उजव्या बाजूला दिलेल्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला किड्स प्रोफाइल दिसून येईल, त्यावर क्लिक करा आणि निश्चिंत होऊन आपल्या मुलांच्या हातात स्मार्टफोन द्या. याव्यतिरिक्त Netflix मध्ये पाच प्रोफाइल बनविण्याचा पर्याय आहे.