शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:12 IST)

एंट्री 'क्रोम 9' ची

गुगल क्रोम हे सर्च इंजिन संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. गुगलने आता क्रोम 9 लाँच केलं आहे. यात अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहेत.
 
* यात webGLफीचर देण्यात आलं आहे. हे क्रोम 9चं सर्वात भारी फीचर आहे. यामुळे क्रोममध्ये थ्रीडी ग्राफिक्स बनवणं शक्य होणार आहे. 
* अॅड्रेसबार मध्ये युआरएल टाईप केल्यानंतर लगेचच वेबपेज लोड होईल. हे फीचर ऑन करावं लागेल. ऑफ्शन्समध्ये जाऊन 'एनेबल इन्सटंट फॉर फास्टर सर्चिंग अँड ब्राउजिंग' तपासावं लागेल. 
* यात क्रोम वेब स्टोअरही आहे. यात बरीच अॅप्स देण्यात आली आहेत. 
* यावर webp files हा अॅप्शनही आहे. 
* क्लाउड प्रिटिंग या ऑप्शनमळे प्रिंटरला कनेक्ट केल्याशिवाय प्रिंट काढता येणार आहे.