शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेस डान्स चॅलेंजअ‍ॅप तुफान लोकप्रिय

फेस डान्स चॅलेंजअ‍ॅप हे विशेष करून आशियाई राष्ट्रांमध्ये तुफान लोकप्रिय झाला आहे. व्हिएतनाममधील डिफचॅट गेम स्टुडिओ या कंपनीने हे अ‍ॅप विकसित केले आहे. फेशियल रेकग्नेशन या तंत्रज्ञानावर आधारित असणारे हे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्टॉल करून उघडल्यानंतर आपल्याला हवा तो संगीताचा ट्रॅक निवडण्याचे सांगण्यात येते. यानंतर संगीत सुरू होताच स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर विविध इमोजी दिसू लागतात. या इमोजीच्या आकारांचे चेहरा त्या युजरला बनवायचा असतो. तो यानुसार चेहरा बनवतो. अर्थात तो किती उत्तमरित्या चेहरा बनवू शकतो? यावरून त्याला गुण प्रदान केले जातात. विशेष म्हणजे याचा तयार करण्यात आलेला व्हिडीओ हा सोशल मीडियात शेअर करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यातून आपल्या मित्रांना हे चॅलेंज पूर्ण करण्याचे आव्हानदेखील देता येते. हे अ‍ॅप अँड्रॉइड (https://play.google.com/store/apps/details?id=com.diffcat.facedance2&hl=en) आणि आयओएस (https://itunes.apple.com/th/app/facedance-challenge/id1253690514?mt=8) या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीम्ससाठी करण्यात आले आहे.