1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (13:44 IST)

गॅर्मिन इंडियाने लाँच केले Vivosmart 4, किंमत आणि फीचर जाणून घ्या

garmin india introduces
स्मार्ट विअरेबल डिव्हाइस मेकर गार्मिन इंडियाने भारतात आपले फिटनेस ट्रॅकर Vivosmart चा नवीन वेरिएंट 'Vivosmart 4' लाँच केले असून त्याची किंमत 12,990 रुपये एवढी ठेवली आहे. नवीन मॉडेलमध्ये स्लीप मॉनिटरिंगसाठी रॅपिड आय मूव्हमेंट मॉनिटर फीचर देण्यात आलं आहे. त्याशिवाय   रक्तातील ऑक्सिजनची मात्रा किती आहे याबद्दल माहिती देण्यासाठी ओएक्स सेन्सर देखील आहे.
 
गॅर्मिनच्या या फिटनेस ट्रॅकरमध्ये या व्यतिरिक्त वॉकिंग, स्विमिंग आणि रनिंगसारखे बरेच मोड दिले गेले आहे. Vivosmart 4 वर कॉल आणि टेक्स्ट मेसेजचे नोटिफिकेशन देखील मिळतील. विशेष गोष्ट म्हणजे अँड्रॉइड वापरकर्ते फिटनेस ट्रॅकरच्या मदतीनेच मेसेजचा रिप्लाई देखील करू शकतात. कंपनीने आपल्या बॅटरीवर 7 दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा केला आहे. हे फिटनेस ट्रॅकर ब्लॅक विथ मिडनाइट, मेरलोट विद रोज गोल्ड, ग्रे विद रोज गोल्ड, ब्लू विद सिल्वर सह 4 कलर वेरिएंटमध्ये उपलब्ध होईल.
 
त्याच्या लॉन्चवर गॅर्मिन इंडियाचे विक्री व्यवस्थापक अली रिझवी म्हणाले, 'चांगली झोप एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. चांगली झोप न घेता, अनेक रोगांच्या बळी पडू शकतो मनुष्य. विमोस्मार्ट 4 च्या स्लिम डिझाइनमुळे रात्री देखील सहजपणे घालता येईल. त्याच्या पल्स ओक्स ग्राहकांना माहिती देतो की ते त्यांच्या आरोग्यात कसे सुधारणा आणू शकतात? गॅर्मिनची 'विवोसमार्ट' सीरीज फिटनेस ठेवणार्‍यांसाठी एक चांगला ट्रॅकर आहे.