गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जगात सगळ्यात जास्त वापरला जाणारा पासवर्ड, आपला देखील हाच तर नाही?

आपले खाते सुरक्षित राहावे यासाठी लोकं वेगवेगळे पासवर्ड ठेवतात. परंतू आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनेक लोकं एक सारखे पासवर्ड वापरतात. तर काही लोकं फुटबॉल टीमचे नाव आपले पासवर्ड म्हणून वापरतात. 
 
या मागील कारण म्हणजे लोकं सोपे पासवर्ड बघू पाहतात. पासवर्ड सोपं असल्यास विसरण्याचा प्रश्नच नाही. यामुळे अनेक लोकं 123456 हा पासवर्ड वापरतात.
 
एक रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की जगातील जवळपास दो कोटी लोकांचा पासवर्ड 123456 आहे. रिसर्चप्रमाणे लोकांना धोक्याबद्दल जागरूक केले असले तरी ते सोपे पासवर्ड ठेवतात ज्यामुळे त्याच्या अकाउंटवर सायबर अटॅकचा धोका वाढतो.
 
रिसर्चमध्ये ते अकाउंट्स बघण्यात आले ज्यांवर हॅकर्सने कॅप्चर केले होते. यात कळून आले की लाखो लोकांनी 123456 हाच पासवर्ड वापरलेला होता. दुसर्‍या क्रमांकावर 123456789 तसेच टॉप फाईव्हमध्ये qwerty आणि  1111111 देखील सामील आहे.