शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

चीनमध्ये 'रोबोट चौकीदार', जाणून घ्या काय आहे यात खास

बीजिंग- चीनची राजधानी बीजिंग येथील एका निवासी समुदायाने पहिला रोबोट पहारेकरी तैनात केला आहे. या रोबोटमुळे आता एखाद्या व्यक्तीला रात्री पहारेदारी करण्याची गरज पडणार नाही. हा रोबोट वॉचमनच्या चेहर्‍याची फोटो कॅप्चर करून त्यांच्याशी गप्पा मारू शकतो.
 
बीजिंग एअरोस्पेस ऑटोमॅटिक कंट्रोल इंस्टिट्यूट (बीएएसीआय) च्या प्रकल्प संचालक लियु गांगजुन यांनी चीनच्या शासकीय वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सला सांगितले की रोबोट मेईबाओ बेकायदेशीर क्रियाकलापांवर नजर ठेवतो आणि  बीजिंगमध्ये मेईयुआन समुदायाच्या लोकांना उपयोगी माहिती देखील पुरवतो. त्यांनी सांगितले की हा रोबोटचे डिसेंबर 2018 ते एप्रिल 2019 पर्यंत परीक्षण केले जात आहे.
 
लियु यांनी सांगितले की बीएएसीआयने चायना ऍकॅडमी ऑफ लाँच व्हीकल टेक्नोलॉजीच्या मदतीने याला विकसित केले आहे. सोसायटीत संदिग्ध व्यक्ती दिसल्यावर रोबोट त्याला ओळखेल आणि अलार्म वाजू लागेल.
 
हा रोबोट हवामान अंदाज देखील दर्शवू शकतो आणि मजेदार कहाण्या आणि गाणी देखील वाजवू शकतो ज्यानेकरुन अनेक मुलं त्याच्याशी बोलण्यास आकर्षित होतात.