1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (16:12 IST)

ड्रोनवरून वितरित होईल आपले सामान, बाल्कनीत लावा घंटा

giant alphabets
कदाचित आपल्याला लवकरच आपल्या बाल्कनीमध्ये देखील घंटा लावावी लागणार आहे, कारण तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्या घरी अन्न किंवा सामानाची डिलिव्हरी दाराचा घंटा वाजवून नव्हे तर बाल्कनीमध्ये ड्रोनने होऊ लागे.
 
ऑस्ट्रेलिया जगातील पहिलं असं देश बनलं आहे, जेथे ड्रोनने अन्न किंवा सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाई विमानचालन नियामक नागरी उड्डयन सुरक्षा प्राधिकरणाने सांगितले की आम्ही विंग एविएशन प्रा. लि. ला उत्तर कॅनबेरामध्ये ड्रोनने डिलिव्हरी मंजूर केली आहे.
 
ड्रोन कंपनी 'विंग' गूगलच्या मातृ कंपनी अल्फाबेटमधूनच निघाली आहे. विंग म्हणाले की गेल्या 18 महिन्यांपासून ड्रोनद्वारे आम्ही पुरवठ्याची तपासणी करत आहो आणि आता ते या सेवेला पूर्ण वेळ चालविण्यात सक्षम आहे.
 
कंपनीने सांगितले की ते ड्रोनने खाणे-पिणे, औषधे आणि स्थानिक कॉफी आणि चॉकलेट पुरावीत आहे. आतापर्यंत 3,000 पेक्षा जास्त वितरण करण्यात आले आहे आणि नियामकांना ही प्रणाली सुरक्षित वाटली.
 
कंपनी म्हणाली की त्यांना दिवसातून 11 ते 12 तास ड्रोनने डिलिव्हरी करण्याची परवानगी मिळाली आहे. हे सर्व ड्रोन विमान देखील स्वतः चालणारे नव्हे तर रिमोटाने चालवणारे असावे. विंगप्रमाणे या सुविधेने रहदारी आणि प्रदूषण कमी होईल तसेच वेळ देखील वाचेल.