बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

ट्विटरचा कठोर नियम, एका दिवसात 400 हून अधिक लोकं करू शकत नाही फॉलो

सॅन फ्रान्सिस्को- मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने स्पॅम पाठवणार्‍यांवर ताबा ठेवण्यासाठी निर्णय घेतला आहे की आता कोणताही यूजर एका दिवसात 400 हून अधिक नवीन हँड्ल्स फॉलो करू शकणार नाही.
 
सॅन फ्रान्सिस्को स्थित या कंपनीकडून जाहीर वक्तव्यात सांगितले गेले आहे की आता यूजर एका दिवसात 400 हून अधिक हँडल्स फॉलो करू शकणार नाही, पूर्वी याची संख्या 1000 होती.
 
ट्विटरच्या संरक्षा टीमने ट्विट केले, 'फॉलो, अनफॉलो, फॉलो, अनफॉलो. कोण करतं असं? स्पॅमर्स (स्पॅम संदेश पाठवणारे)'
 
टीमने लिहिले की या कारणामुळेच आम्ही एका दिवसात फॉलो करणार्‍या हँल्डसची संख्या 1000 हून कमी करत 400 करत आहे. आपण काळजी करू नका. आपल्या समस्या येणार नाही. उल्लेखनीय आहे की ट्विटर नीती स्पॅम पाठवणे प्रतिबंधित करते.