बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (12:29 IST)

'या' अॅपवरून दिवाळीत 1 रुपयांत खरेदी करता येणार सोनं

मर्चेंट पेमेंट प्लॅटफॉर्म भारतपेने (BharatPe) मर्चेंट्ससाठी डिजिटल गोल्ड प्रोडक्टची (Digital Gold Product) घोषणा केली आहे. भारतपेने मर्चेंट्ससाठी ही सुविधा सेफगोल्डसह (Safegold) उपलब्ध केली आहे. सेफगोल्ड एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो ग्राहकांना 24 तास लो तिकिट साइजवर 24 कॅरेट फिजिकल गोल्डची (Physical Gold) खरेदी, विक्री आणि डिलिव्हरीची सुविधा देतो. भारतपेनुसार, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून कधीही, कुठूनही 99.5 टक्के 24 कॅरेट सोनं खरेदी आणि विक्री केलं जाऊ शकतं.
 
किंमत किंवा वजनाच्या हिशोबाने सोन्याचा व्यापार -
भारतपेने दिलेल्या माहितीनुसार, किंमत किंवा वजनाच्या हिशोबाने सोन्याच्या खरेदीचा व्यापार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. भारतपेवर 1 रुपयांत सोनं खरेदी करू शकतात. पेमेंटसाठी BharatPe बॅलेन्स किंवा UPIचा वापर केला जाऊ शकतो. दिवाळीपर्यंत 6 किलो सोनं विकण्याचं भारतपेचं लक्ष्य आहे. मर्चेंट्स, ग्लोबल मार्केट्समधून सोन्याच्या रियल टाईम किंमती पाहू शकतात. मर्चेंट्स, सोन्याच्या खरेदीवर जीएसटी इनपुट क्रेडिटचाही लाभ घेऊ शकतील.
 
मर्चेंट्स फिजिकल गोल्डच्या डिलिव्हरीचाही पर्याय निवडू शकतात. डिजिटल गोल्डच्या विक्रीवर मर्चेंट, मिळणारी रक्कम भारतपे रजिस्टर्ड अकाउंट किंवा आपल्या बँक अकाउंटमध्ये घेऊ शकतात. सेफगोल्डने सोन्याच्या खरेदीबाबत मर्चेंट्सचं-व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी आयडीबीआय (IDBI) ट्रस्टीशीप सर्विसेजची नियुक्ती केली आहे. खरेदी करण्यात आलेलं सोनं सेफगोल्डसह 100 टक्के इंश्योर्ड लॉकर्समध्ये कोणतंही अतिरिक्त शुल्क न घेता सुरक्षित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
भारतपे ग्रुपचे अध्यक्ष सुहेल समीर यांनी सांगतिलं की, या प्लॅटफॉर्मवर गोल्ड लाँच करण्यासाठी अनेक ग्राहक आग्रही होते. त्यानंतर आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्ड प्रोडक्ट लाँच केलं. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाँचिंगच्याच दिवशी 200 ग्रॅम सोन्याची विक्री करण्यात आली. या प्लॅटफॉर्मवर हळू-हळू नवे फीचर्स जोडले जाणार असून आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 30 किलो सोनं विकण्याचं लक्ष असलण्याचं ते म्हणाले.