शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (17:30 IST)

गूगल अॅलोने केला असिस्टंट फीचरमध्ये हिंदी भाषेचा समावेश

google allo
गूगल अॅलोचे सर्वाधिक यूझर्स असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. त्यामुळे लोकांची गरज ओळखून गूगल अॅलोने असिस्टंट या लोकप्रिय फीचरमध्ये हिंदी भाषेचा समावेश केला आहे. अँड्रॉईड आणि आयफोन यूझर्ससाठी हे फीचर उपलब्ध होणार आहे. मेसेजिंग अॅप अॅलोच्या हिंदी भाषेच्या पर्यायासाठी अपडेट करावे लागणार आहे. गूगल अॅलोमध्ये असिस्टंट फीचरचा वापर सर्व प्रकारची मदत मिळवण्यासाठी केला जातो. अॅप वापरताना कुठलीही अडचण आल्यास असिस्टंटद्वारे मदत मिळवता येते. मात्र सध्या ही मदत मिळण्यासाठी केवळ इंग्रजीमध्ये आहे.