शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (15:23 IST)

Google, Apple ने भारतात टिकटॉक डाऊनलोडावर बंदी घातली

भारतात आता कोणीही टिकटॉक अॅप डाउनलोड नाही करू शकणार. प्रत्यक्षात Google Play Store आणि
Apple ने आपल्या अॅप स्टोअरवरून हे डाउनलोड करणे थांबविले आहे. केंद्र सरकारच्या विनंतीवर चीनच्या या
शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग अॅपवरील एसेसवर बंदी घातली आहे. हा अॅप भारतात 23 कोटी वेळा डाउनलोड झाला
आहे.
 
या अॅपबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने 3 एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी
घालण्यास नकार दिला होता. त्यानंतर, इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने गूगल आणि ऍपलशी
या अॅपच्या देशातील डाऊनलोडावर बंदी घालण्याची विनंती केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पिठाने मंगळवारी टिकटॉकवरून बंदी काढण्यासाठी नकार दिला होता, आणि 24 एप्रिलला पुढील सुनावणीचा निर्णय घेतला गेला.  
 
गूगलच्या एका प्रवक्ताने सांगितले की, आम्ही धोरणामुळे वेग वेगळ्या अॅप्सवर काहीही टिप्पणी करत नाही,
परंतु ज्या देशात आम्ही काम करतो, तेथील नियमांचे पालन करतो. तसेच टिकटॉक कंपनीचे म्हणणे आहे की भारतीय न्यायिक व्यवस्थेत कंपनीला पूर्ण विश्वास आहे. 
 
टिकटॉक प्रवक्ता म्हणाले, आम्ही आशावादी आहोत की जे काही परिणाम येतील, ते भारतातील 12 कोटी सक्रिय वापरकर्ते ऐकतील आणि टिकटॉकच्या माध्यमातून कलात्मक आणि दैनिक जीवनाचे खास क्षण कॅप्चर करतील.
 
तसेच सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या चिनी अॅपवर बंदी लावण्याच्या निर्णयावर सध्या नकार दिला आहे आणि 22 एप्रिल रोजी सुनावणीची पुढील तारीख निश्चित केली. मद्रास उच्च न्यायालयाने 3 एप्रिल रोजी टिकटॉकद्वारे पोर्नोग्राफिक आणि अनुचित सामग्री उपलब्ध करवण्यामुळे केंद्राला अॅपवर बंदी घालण्याचा ऑर्डर दिला होता. टिकटॉक दरमहा आपल्या 5.4 कोटी वापरकर्त्यांना व्हिडिओ तयार आणि शेअर करण्याची परवानगी देतो   आणि त्यात अनुचित सामग्री असू शकते. 
 
या अॅपचे वापरकर्ते मीम, गाण्याच्या बोलांवर व्हिडिओ तयार करून फेसबुक, व्हाट्सएप आणि शेअर चॅटवर शेअर करायचे. या सोशल मीडिया अॅप्समुळे बहुतेक प्रौढांना या अॅपबद्दल माहित झाले होते.