मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (15:58 IST)

Saregama Carvaan Go झालं लॉन्च, 3000 गाणी आता आपल्या खिशात

सारेगामा आता आपला नवीन पोर्टेबल ऑडियो प्लेयर "Carvaan Go" घेऊन आला आहे, कंपनीने याची किंमत 3,990 रुपये एवढी ठेवली आहे. आपण कंपनीच्या अधिकृत सारेगामा स्टोअरवरून त्याची खरेदी करू शकता. हे फारच लहान, हलके आणि फक्त 88 ग्रॅम वजनाचे आहे. हे मेटल बॉडीचे बनलेले आहे, त्यामुळे त्याची रचना खूप आकर्षित करते.
 
* प्री-लोडेड 3000 सदाबहार गाणी संग्रह - Carvaan Go ऑडियो प्लेयरमध्ये ऑरिजिनल प्री-लोडेड 3000 सदाबहार गाण्यांचा संग्रह आहे. गाणी कलाकार, स्पेशल्स आणि प्री-क्युरेटेड प्लेलिस्टमध्ये विभागली गेली आहे. त्यात, मूडनुसार गाणी सेट करण्यात आले आहे जसे - रोमान्स, आनंद, दुःख इत्यादी. यात तुम्ही मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकरासारखे इतर कलाकारांना ऐकू शकतात. 
 
* 7 तासांपर्यंतचे म्युझिक प्लेबॅक - Carvaan Go मध्ये FM/AM स्टेशन देखील आहेत. एवढंच नव्हे तर त्यात आपण मायक्रो एसडी कार्डमध्ये आपले आवडते गाणे टाकून देखील लावू शकता. हे डिव्हाईस 32 जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करतो. आपण हे कुठेही घेऊन जाऊ शकतो. यात एक लहान स्पीकर लागला आहे. कंपनीने दावा केला आहे की हे 7 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देतं, यात एक बॅटरी देखील दिली आहे. कंपनी या डिव्हाईसवर सहा महिने वॉरंटी देत आहे.