शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (15:52 IST)

गूगल ड्यूओ मध्ये आला डेटा सेव्हिंग फीचर

व्हिडिओ कॉलिंग सुविधा देणार्‍या गूगल ड्यूओ (Google Duo) मध्ये डेटा सेव्हिंग फीचर देण्यात आले आहे. हे फीचर सध्या अँड्रॉइडच्या काही वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. या मोडला सेटिंग्जमध्ये जाऊन ऍक्सेस केलं जाऊ शकता आणि टॉगल फ्लिक केल्यानंतर याला बदलू शकता.  
 
डेटा सेव्हिंग मोड चालू झाल्यानंतर हा मोबाइल डेटा सक्रिय करण्यासाठी व्हिडिओ गुणवत्ता कमी करतो. गूगल ड्यूओ विस्तारित करताना काही काळापूर्वी त्याचे वेब व्हर्जन देखील आणण्यात आले होते, ज्याच्या माध्यमातून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल केले जाऊ शकतात. डेटा सेव्हिंग मोड सक्रिय केल्यानंतर एक संदेश दिसेल, यात लिहिले असेल की गूगल ड्यूओ ऑटोमेटिकली मोबाइल नेटवर्कवर डेटा वापर मर्यादित करेल. हे फीचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी तर लॉन्च करण्यात आले आहे पण iOS वापरकर्त्यापर्यंत हे कधी पोहोचणार आहे अद्याप याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही.