शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (12:17 IST)

Whatsapp Group मध्ये एड करण्यासाठी इनवाइट लिंक पाठविणे आवश्यक

व्हाट्सएप लवकरच ग्रुपमध्ये सामील करण्यासाठी इनविटेशन लिंक सुरू करणार आहे, ज्यानंतर वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय एखाद्या व्यक्तीला व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील केले जाऊ शकणार नाही.
 
व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी पाठविलेला जॉइनिंग इनविटेशन, तीन दिवसांपेक्षा जास्त काळ सक्रिय राहणार नाही. या दरम्यान आमंत्रण प्राप्त करणारा वापरकर्ता त्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकतो, अन्यथा तो निष्क्रिय होईल.
 
इन्स्टंट मेसेजिंग एप व्हाट्सएपने वापरकर्त्याच्या सोयीसाठी इनवाइट प्राप्त करणार्‍या वापरकर्त्यासाठी तीन पर्याय जारी करेल. यासाठी वापरकर्त्याला व्हाट्सएप सेटिंग्जवर जाणे आवश्यक आहे. त्यानंतर, अकाउंट पर्यायावर क्लिक करावे, मग प्रायवेसी या पर्यायावर क्लिक करा. यानंतर, ग्रुप नावाच्या पर्यायावर क्लिक करा, त्यात तीन पर्याय उघडतील, एव्रीवन, माय कॉन्टॅक्ट आणि नोबडी.