मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फक्त एका संदेश आणि अकाउंट रिकामे

गेल्या काही दिवसात बँकिंग फ्रॉडच्या बर्‍याच बातम्या येत आहे. दररोज अशी बातमी ऐकायला येते की एखाद्याच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढले गेले आणि त्याला याबद्दल काहीच माहिती नाही मिळाली. बर्‍याच बाबतीत तर फसवणूक करून खाजगी माहिती काढून लोकांना अडकवण्यात येतं. तर अनेकदा ठग नवीन मार्गाने लोकांचे खाती रिकामे करत आहेत. 
 
वर्तमानात सर्व बँका कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी ओटीपी (वन टाइम पासवर्ड) वापरतात, पण सुरक्षित असले तरी हे ओटीपी लोकांसाठी त्रासदायक झालं आहे. तर चला जाणून घ्या की ओटीपीद्वारे फसवणूक कशी होते आणि हे टाळण्याचा काय काळजी घ्यावी.
 
या प्रकारे करतात फसवणूक
बदमाश आपल्याला कॉल करतात आणि स्वतःला बँक कर्मचारी असल्याचे सांगतात. नंतर ते आपल्याला ओटीपी विचारतात. नाही सांगितल्यावर कार्ड ब्लॉक करण्याचा धोका असल्याचे देखील सांगतात पण अशात आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि ओटीपी सांगण्याची गरज देखील नाही. कोणतीही बँक या प्रकारे ओटीपी मागत नाही हे लक्षात असू द्यावे.
 
ओटीपी काढून घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे आपल्या फोनवर आलेला ओटीपी माहीत करण्यासाठी मॅलवेयर (व्हायरस) ची मदत घेणे. याद्वारे बदमाश ओटीपी जाणून घेतल्यानंतर सहजपणे आपल्या बँक खात्यापर्यंत पोहोचतात. 
 
आता प्रश्न म्हणजे व्हायरस अटॅक टाळण्यासाठी काय करावे? 
यासाठी कोणतेही अॅप्स डाउनलोड करण्यापूर्वी काळजी घ्या. तसेच मेसेजवर किंवा कोणत्याही प्रकारे एखाद्या लिंकसह संदेश मिळाल्यास त्यावर क्लिक करणे टाळा.