1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 नोव्हेंबर 2018 (08:10 IST)

युट्युब चा असाही वापर, छापल्या बनावट नोटा

Such use of YouTube
सहारणपूरमध्ये चार जणांनी युट्युबवर नकली नोटा कशा छापतात हे पाहून नकली नोटा छापल्या. नंतर या नोटा त्यांनी व्यवहारात आणल्या. अखेर मंगळवारी मिळालेल्या खबरीवरून पोलिसांनी या चौघांना अटक केली व त्यांच्याकडून साडे तीन लाख रुपयांच्या नकली नोटा आणि प्रिंटर, स्कॅनर जप्त केले आहे. आमिर अफजाल, उपेंद्र आणि सुभाष या चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडे ४४ हजार रुपयांच्या नकली नोटा सापडल्या आहेत. तर या नोटांमध्ये अडीच हजारहून अधिक नोटा या शंभर रुपयांच्या आहेत. चौघांना अटक करून त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली आली. तपासादरम्यान आपण युट्युबवरून नोटा छापण्याची पद्धत आत्मसात केली असे आरोपींनी कबूल केले.