1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (19:40 IST)

गुगलने या अॅप्सवर बंदी घातली, आपल्या फोन मधून त्वरित डिलिट करा

Google Play Store
Android Malware: गुगलने प्ले स्टोअरवरून चार अॅप काढून टाकले आहेत. या अॅप्समध्ये जोकर मालवेअर आढळून आला आहे.  तुमच्या फोनमध्ये हे अॅप्स असतील तर लगेच डिलीट करा.जोकर व्हायरस पुन्हा आला आहे. या व्हायरसची लागण झालेले असे काही अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर होते. त्यामुळे अनेकांनी असे धोकादायक अॅप डाऊनलोड केले आहेत.  यामध्ये जोकर व्हायरस आढळून आला आहे, जो अँड्रॉइड यूजर्ससाठी धोकादायक ठरू शकतो.  
 
जोकर व्हायरस पहिल्यांदा 2017 मध्ये दिसला होता. सायबर गुन्हेगारांसाठी ही एक अतिशय लोकप्रिय आहे. याद्वारे ते अँड्रॉइड यूजर्सना टार्गेट करतात. सायबर सुरक्षा संशोधकाने याबाबत इशारा दिला आहे.  
 
रिपोर्टनुसार, गुगल प्ले स्टोअरवरील अनेक अॅप्समध्ये जोकर मालवेअर आढळले आहेत. हे अॅप्स 100,000 हून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
 
अहवालात असे म्हटले आहे की Google Play Store वरील स्मार्ट एसएमएस संदेश, ब्लड प्रेशर मॉनिटर, व्हॉईस लँग्वेज ट्रान्सलेटर आणि क्विक टेक्स्ट एसएमएस अॅप्समध्ये जोकर मालवेअर आढळले आहेत.  
 
रिसर्च टीमने गुगलला याची माहिती दिली, त्यानंतर हे अॅप्स प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत. हे अॅप्स काढण्याच्या प्रक्रियेपूर्वी 1 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. याचा अर्थ अनेक लोकांची उपकरणे धोक्यात आहेत.  तुम्हीही हे अॅप्स डाऊनलोड केले असतील, तर तुम्ही ते लगेच डिलीट करावेत. याशिवाय फोनचा पासवर्ड बदलणे आवश्यक आहे.