रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated: रविवार, 10 जुलै 2022 (15:30 IST)

Ravindra Jadeja vs CSK: रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जमधून बाहेर होणार का? संघाशी संबंधित सर्व इंस्टाग्राम पोस्ट हटवले

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा सध्या फ्रँचायझीवर खूश दिसत नाहीये. जडेजाच्या अलीकडच्या वृत्तीवरून असे दिसते. त्याने 2021 पासून चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून काढून टाकल्या आहेत. यानंतर जडेजा येत्या हंगामात चेन्नईकडून खेळताना दिसणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जडेजा आणि सीएसकेने सोशल मीडियावर एकमेकांना आधीच अनफॉलो केले होते. त्यानंतर जडेजाने आपल्या इंस्टाग्राम बायोमधून चेन्नईचे नाव काढून टाकले आणि आता गेल्या दोन वर्षातील सर्व पोस्ट हटवल्या. इतकेच नाही तर जडेजाने महेंद्रसिंग धोनीला 7 जुलैला वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या नाहीत.
 
जडेजा 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जशी जोडला गेला होता. 10 वर्षांत त्याने संघासह दोन विजेतेपदे जिंकली. यावर्षी स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. रवींद्र जडेजाला पुढचा कर्णधार बनवण्यात आला. त्यांनी 37 दिवसांनंतरच पद सोडण्याचा निर्णय घेतला. धोनीला पुन्हा संघाची धुरा सांभाळावी लागली.