संबंधित माहिती
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन, कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखला
- नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी मोहीम सुरू
- विवाहितेचा जळून मृत्यू : घातपात केल्याचा भावाचा आरोप
- राष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
- कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये जबर हाणामारी : १ गंभीर जखमी झाला ; तर दोघांवर गुन्हा दाखल
दोन महिने प्रशासक बसू द्या आणि हा विषय मिटवा : पंकजा मुंडे
राज्य सरकारनं आता ओव्हरड्यूची व्याख्या ठरवावी. तुम्ही सांगा प्रशासक बसवलाय, मग आणखी दोन महिने प्रशासक बसू द्या आणि हा विषय मिटवा, असं आवाहनही भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलंय. पंकजा मुंडेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या देशात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ओव्हरड्यू झालेल्या आहेत. फक्त ओबीसी आरक्षणाच्याच निवडणुका ओव्हरड्यू झालेल्या नाहीत. प्रशासक बसलेत, प्रशासक दोन महिने अजून बसतील. मग ओबीसीचं आरक्षण पूर्ण करून जो काही डेटा कोर्टात द्यायचा आहे, तो तात्काळ देऊन ओबीसीच्या आरक्षणासहीत निवडणुका घ्याव्यात. मी प्रत्येक वेळी सांगतेय आणि सावध करतेय, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
