सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मार्च 2022 (07:52 IST)

कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये जबर हाणामारी : १ गंभीर जखमी झाला ; तर दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात टीव्ही बघण्याच्या कारणावरून कैद्यांच्यात हाणामारीत झाली. यामध्ये जन्म ठेपेची शिक्षा भोगणारा कैदी सुरेश कचरू वैती ( वय ७० ) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी खुनाच्या गुन्ह्यातील संशयित कैदी दस्तगीर गफूर शहा व बैतुल अब्दुल शेख यांच्यावर जुना राजवाडा येथे गुन्हा दाखल झाला आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबा कारागृहात दोन दिवसांपूर्वी कैदी टीव्ही बघत बसले होते. त्यावेळी मनाविरुद्ध चॅनेल लावल्याने कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्याचा राग मनात धरून खुनाच्या गुन्ह्यातील संशयित कैदी दस्तगीर गफूर शहा यांच्या सांगण्यावरून बैतुल अब्दुल शेख हा कैदी सर्कल नंबर ६ जवळ गेला. त्याने जवळ पडलेला काचेचा तुकडा घेऊन वयस्कर असलेला कैदी सुरेश वैती याच्यावर हल्ला केला . या हल्ल्यात हाताला काच लागल्याने सुरेश वैती हा कैदी जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या वादावादीप्रकरणी कारागृहातील प्रकाश शिवाजीराव लोमटे या सुरक्षा अधिकाऱ्याने तक्रार दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बैतुल शेख व दस्तगीर शहा या दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.