शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मार्च 2022 (14:46 IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन, कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी झाली होती.  शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघनेनी केली आहे. त्यासाठी हे आंदोलन करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग रोखून धरलाय. शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानीनं गेल्या 20 दिवसापासून आंदोलन केले आहे. 
 
12 वीची आज परीक्षा असल्याने स्वाभिमानी संघटनेने 11 नंतर चक्का जाम आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलन बारावीचं मुलं परीक्षेला गेल्यानंतर करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना मदत करा, असेही त्यांनी म्हटले आहे.