शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

बर्गर इमोजीचा वाद मिटला

Credit: Emojipedia
बर्गरमध्ये चीज स्लाईस हे पॅटीच्या खाली असावे की वर या क्षुल्लक कारणावरुन सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. गुगलच्या बर्गर इमोजीमध्ये चीज स्लाईस हे सर्वांत खाली दाखवण्यात आले होते. तर अॅपलच्या बर्गर इमोजीमध्ये चीज स्लाईस हे सर्वात वर दाखवण्यात आले होते. त्यामुळे अॅपलचे इमोजी बरोबर की गुगलचे? यावरुन वाद सुरु होता.
 
 
या गहन प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनही वादात खेचण्यात आले होते. पिचाईंच्या मार्मिक उत्तराने हा वाद तूर्तास थांबला होता. पण आता गुगलने काहीसे नमते घेत आपल्या वादग्रस्त इमोजीमध्ये बदल करुन पॅटीच्यावर चीज ठेवलेला इमोजी त्याजागी आणला आहे. 
 
इमोजीपिडायने ट्विट करत गुगलने आपला बर्गर इमोजी दुरुस्त केल्याचे जाहीर केले. अँड्राईड 8.01 वर हा इमोजी असणार आहे. बॅकडल मीडियाचे संस्थापक थॉमस बॅकडल यांनी काही दिवसांपूर्वी या वादाला तोंड फोडले होते. यामध्ये त्यांनी पिचाईंना खेचण्याचा प्रयत्न केला.