काय सांगता, Google च्या नव्या फीचर्स मध्ये गणिताचे उत्तरे मिळणार
गूगल ने आपल्या 'L10n' या कार्यक्रमात भारताच्या स्थानीय भाषांच्या यूजर्ससाठी बरेच फीचर्स जाहीर केले आहेत. त्यांच्या साहाय्याने ट्रान्सलिटरेशनला यूजर्स साठी आणखी सोपे केले आहेत. गूगलने असे म्हटले आहे की ते असे वैशिष्ट्ये समाविष्ट करत आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये शोध करण्यात आणि गूगल मॅप वर नॅव्हिगेट करण्यात सोपे होईल. या व्यतिरिक्त, यूजर्स हिंदी भाषेत देखील गणिताचे प्रश्न सोडवणे शिकतील.
गूगल लॅन्स चमत्कार करेल -
यूजर्स गूगल लॅन्सद्वारे गणिताच्या प्रश्नांची छायाचित्रे घेऊ शकतात आणि त्यांना सोडवायचे कसे हे शिकू शकतात. या साठी लॅन्स सर्वप्रथम इमेजला क्वेरी मध्ये रूपांतरित करतो. नंतर त्याच्या आधारे गूगल प्रत्येक चरणांनुसार मार्गदर्शन करण्यास मदत करतो.
नवीन वैशिष्टयाच्या विषयी बोलताना गूगल इंडियाचे कंट्री हेड आणि व्हाइस प्रेसिडेंट संजय गुप्ता म्हणाले की, गूगलने इंटरनेटवर स्थानीय भारतीय भाषेच्या सामग्री किंवा कन्टेन्टचा वापर, संभाषण आणि सर्जनशीलताशी निगडित आव्हानांना दूर करण्यासाठी गूगलने वैशिष्टये जोडली आहे.
ते म्हणाले की ह्या नवीन वैशिष्ट्यामुळे यूजर्सला भाषिक समस्यांना सोडविण्यासाठी मदत मिळेल. गूगल ने आपल्या 'L10n' वर्च्युअल प्रोग्रॅम मध्ये चार नवीन भाषा फीचर्स जाहीर केल्या आहे.
नवे फीचर्स गूगल उत्पादना मध्ये अधिक भारतीय भाषांना सपोर्ट करतात. तसेच आपल्या नवीन बहुभाषिक मॉडेल साठी MURIL(मल्टी लँग्वेज रिप्रेझेन्टेशन फॉर इंडियन लँग्वेज) देखील जाहीर केले आहे.