शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (13:53 IST)

4 दिवसात बंद होणार Google ची ही खास सेवा, डेटा करा ट्रांसफर

गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेल्या गुगलच्या विशेष सेवा या महिन्यात बंद होणार आहेत. 24 फेब्रुवारी ला Google Play Music अॅप बंद होणार असून नंतर गूगल या अॅपला कोणत्याही प्रकारे सपोर्ट करणार नाही. अशात आपण Google Play Music अॅप वापरत असाल तर केवळ 4 दिवस शिल्लक आहेत. 
 
माहितीनुसार गूगल आपल्या प्ले म्यूजिक अॅपला यूट्यूब म्यूजिक अॅपद्वारे रिप्लेस करणार आहे. या संबंधी घोषणा मागील वर्षी करण्यात आली होती. आपले अजूनही या अॅपवर आवडते गाणी जतन असतील तर दुसर्‍या अॅपवर ट्रांसफर करुन घ्यावी.
 
Google देखील आपल्या यूजर्सला मेल करुन प्ले-म्यूजिक अॅप डेटा YouTube Music अॅपवर ट्रांसफर करण्याबाबत सूचना देत आहे. अॅप डेटामध्ये यूजर्सची म्यूजिक लायब्रेरी आणि खरीदी केलेली गाणी सामील आहेत. एकदा डेटा डिलीट झाल्यावर रिकव्हरी करता येणार नाही.
 
या प्रकारे करा डेटा ट्रान्सफर 
जर आपण आपल्या गूगल प्ले-म्यूजिक चा डेटा ट्रांसफर करु इच्छित असाल तर मोबाइल अॅप किंवा पुन्हा music।google।com वर जाऊन करता येईल. मोबाइल अॅपचे डेस्कटॉपवर आपल्या डेटा ट्रांसफरसाठी YouTube Music किंवा दुसर्‍या जागी पर्याय सापडेल. आपण इच्छुक असल्यास संपूर्ण म्यूजिक लायब्रेरी देखील डाउनलोड करु शकता किंवा डिलीट करु शकता.