बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (10:46 IST)

whatsapp वर डीलीट झालेले व्हिडीओ आणि फोटो पुन्हा मिळविता येणार

आता पुन्हा एकदा whatsapp ने खास अशी सुविधा आणली आहे. यामध्ये whatsapp वर व्हिडीओ आणि फोटो डिलीट झाल्यानंतर ही पुन्हा मिळवता येणे शक्य होणार आहे. Whatsapp मधील हा डेटा ३० दिवसांच्या आत तुम्ही पुन्हा डाऊनलोड करु शकता. मात्र, १ महिन्याच्या कालावधीनंतर हा डेटा Whatsapp सर्व्हरवरुन गायब होतो.
 
डिलीट केलेले फोटो पुन्हा कसे मिळवाल?
एखाद्या युजर्सने संपूर्ण चॅट डिलीट केले नसेल तर फोटो पुन्हा डाऊनलोड करु शकतात. यासाठी आपल्याला चॅट ओपन करुन त्या फोटोपर्यंत स्क्रोल करावे लागेल. जो आपल्याला हवा आहे. त्यानंतर आपण तो फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा डाऊनलोड करु शकता. हे लक्षात ठेवा की, फोटो डिलीट केल्यानंतर ३० दिवसांच्या आत फोटो आणि व्हिडीओ परत घेतले जाऊ शकतात.