1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मार्च 2018 (15:24 IST)

बाप्परे, आयफोन चक्क ४७ वर्षांसाठी लॉक झाला

i phone for 47 years
चीनमधील शांघाय येथे एका २ वर्षांच्या  चिमुरड्याने आईचा आयफोन चक्क ४७ वर्षांसाठी लॉक केला आहे. चुकीचा पासवर्ड अनेकवेळा टाकल्याने आयफोन २३ मिलियन मिनिटं म्हणजेच ४७ वर्षांसाठी लॉक झाला आहे. लू नावाच्या महिलेचा हा आयफोन आहे.
 

काही दिवसांपूर्वी लू बाहेर कामासाठी गेली होती. जाताना तिने मुलाला मोबाईल गेम खेळण्यासाठी दिला होता. पण घरी परतल्यावर मोबाईल लॉक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने खूप प्रयत्नही केला पण मोबाईल काही अनलॉक होत नव्हता. यामुळे ती मोबाईल गॅलरीत गेली. टेक्निशियनने मोबाईल तपासला असता चुकीचा पासवर्ड अनेकदा टाकल्याने तो ४७ वर्षांसाठी लॉक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.