1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 मार्च 2018 (16:30 IST)

तोगडिया यांच्या गाडीला अपघात, हत्येचा कट असल्याचा आरोप

pravin togdia

सुरतजवळ विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. या अपघातातून तोगडिया बचावले आहेत. मात्र आपल्या हत्येचा हा कट होता, असा आरोप त्यांनी केला आहे. या अपघातानंतर ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.

“ट्रकने गाडीला मागून धडक दिली. जर माझी गाडी बुलेटप्रूफ नसती, तर मी आज जिवंत नसतो. हा माझ्या हत्येचा कट होता”, असं तोगडिया म्हणाले.

मला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, मात्र पूर्ण सिक्युरिटी अद्याप का दिलेली नाही, असा सवाल तोगडियांनी उपस्थित केला आहे. मला केवळ एक व्हॅन देण्यात आली आहे. पोलिसांची एस्कॉर्ट व्हॅन आणि रुग्णवाहिका दिलेली नाही, असं तोगडियांनी सांगितलं.