बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओ दिवाळी धन धना धन ऑफर, शंभर टक्के कॅशबॅक

जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. ग्राहक 399 रूपयांचा रिचार्ज करून वर्तमान टॅरिफचा फायदा घेऊ शकतात. 
 
399 रूपयात तीन महिन्याचा ऑल अनलिमिटेड प्लॅन ग्राहकांना मिळणार. ज्यात फ्री व्हॉइस कॉलिंग, फ्री SMS, रोमिंग आणि STD फ्री राहील. दररोज 1जीबी डेटा ग्राहक वापरू शकतील. 1जीबी वापरल्यानंतर स्पीड कमी झाली तरी हे अनलिमिटेड असणार. हे ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. 
 
जिओ दिवाळी धन धना धन ऑफरचा फायदा घेण्यासाठी प्रीपेड ग्राहकांना 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान रिचार्ज करावे लागणार आहे. हे अॅडवांस रिचार्ज मानले जाईल आणि ग्राहकांची वर्तमान प्लॅनची अवधी समाप्त झाल्यावर हा प्लॅन लागू करण्यात येईल. तसेच जिओ वर्तमान टॅरिफ प्लॅन्समध्ये 19 ऑक्टोबरपासून परिवर्तन करू शकतं. 
 
शंभर टक्के कॅशबॅक
कंपनीने ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक असा ऑफर दिला आहे. 399 रूपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 50 रूपयांचे 8 व्हाउचर मिळतील अर्थातच 399 रूपयांवर 400 रूपये कॅशबॅक. ये व्हाउचर्स 309 रुपय्याहून अधिकच्या रिचार्जवर वापरले जाऊ शकतात. यासह 99 रुपय्याहून अधिकच्या डेटा एड-ऑनवर ही वापरले जाऊ शकतात. हे व्हाउचर 15 नोव्हेंबरपर्यंत वापरले जाऊ शकतात. हे रिचार्ज जिओ वेबसाइट, रिलायंस डिजीटल आणि जिओ स्टोअर या माध्यमातून केलं जाऊ शकतं.