शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (17:10 IST)

जिओची मान्सून हंगामा ऑफर

जिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून हंगामा ऑफर असे नावही देण्यात आले आहे. यामध्ये ६ महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच अनलिमिटेड ४ जी डेटा मिळणार आहे. जिओकडून मागच्या काही दिवसांत इंटरनेटच्या विशेष ऑफर्स देण्यात आल्यानंतर आता ही आणखी एक खास ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये डेटा आणि कॉलिंगसोबतच अनलिमिटेड मेसेजची सुविधाही देण्यात आली आहे. 
 
याशिवायही जिओने आणखी दोन प्लॅन जाहीर केले आहेत. ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच दररोज १०० एसएमएस आणि रोज ५०० एमबी ४ जी डेटा मिळणार आहे. जियो फोन आणि जियो फोन २ च्या युजर्ससाठी असणाऱ्या या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. म्हणजेच युजर्सना एकूण १४ जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबरच कंपनीने १५३ रुपयांचाही एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज १.५ जीबी ४ जी डेटा मिळणार असून त्याची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. म्हणजेच युजर्सना एकूण ४२ जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबर अनलिमिटेड वॉईस कॉल आणि रोज १०० मेसेजही मिळतील.