मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (18:15 IST)

घरात स्मार्ट डिव्हाईस वापरत असाल तर या प्रकारे सुरक्षित ठेवा

काळाप्रमाणे प्रत्येक जण स्वतःला अपग्रेड ठेवू इच्छितो ऑफिस पासून ते घरा पर्यंत प्रत्येक जण स्मार्ट डिव्हाईस चा वापर करत आहे. हाताला स्मार्ट वॉच, घरात स्मार्ट टीव्ही,स्मार्ट फ्रीज सारख्या इतर बऱ्याच गोष्टींना वापरण्यात सुरुवात केली आहे. हे स्मार्ट डिव्हाईस आयुष्याला सोपं बनवतात आणि वेळ देखील वाचवतात. पण जसं नाणाच्या दोन बाजू असतात. त्याच प्रमाणे प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात. आपण सहजरित्या स्मार्ट डिव्हाईस चा वापर करता पण आपण ह्यापासून होणाऱ्या नुकसाना बद्दलचा विचार केला आहे का? आम्ही सांगत आहोत काही अशा टिप्स बद्दल ज्यामुळे आपण स्वतःला आणि आपल्या डिव्हाईसला सुरक्षित ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1 डिव्हाईस नेहमी ब्रँडेड असावे -
आपल्या स्मार्ट डिव्हाईस आणि स्वतःला सुरक्षित ठेवू इच्छिता तर सर्वप्रथम लोकल डिव्हाईस ला नाही म्हणा. हे लोकल डिव्हाईस आपल्याला कधीही धोका देऊ शकतात. ब्रँड चे उत्पाद लोकल उत्पादना पेक्षा अधिक सुरक्षित असतात बरेच ब्रँड स्मार्ट डिव्हाईसमध्ये बॅकअप देखील देतात. 
 
2 पासवर्ड योग्य असावा- 
आजच्या प्रत्येक स्मार्ट डिव्हाईस मध्ये पासवर्ड सेट असतो. आपण जेव्हा स्मार्ट डिव्हाईस खरेदी करता तर त्याचे पासवर्ड आवर्जून बदलावे. पासवर्ड नेहमी असा असावा, जेणे करून त्याला हॅक करू शकणार नाही. युजरनेम आणि पासवर्ड वेळोवेळी बदलणे देखील आपल्याला सुरक्षित ठेवू शकते. प्रायव्हसी पॉलिसी टर्म  देखील लक्षात ठेवा. 
 
3 नेट योग्य असावा - 
जर आपण स्मार्ट डिव्हाइसचा वापर करीत आहात तर नेट देखील चांगले असावे. नेट बाबत तपासणी करा की जे नेट आपण वापरात आहात ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही. कधी कधी लोकल नेटवर्कच्या माध्यमाने देखील स्मार्ट डिव्हाईसला हॅकर्स हॅक करतात. म्हणून आपण जेव्हा स्मार्ट डिव्हाईस ला नेट ने कनेक्ट कराल तेव्हा सायबर सुरक्षिततेची काळजी घ्या. 
 
4 सिंगल हॅन्ड वापरा -
बरेच स्मार्ट डिव्हाईस असे असतात ज्यांना सिंगल हॅन्ड म्हणजे एक हातीच वापरणे योग्य आहे. बऱ्याच वेळा घरातील सर्व सदस्य हाताळतात जेणे करून डिव्हाईस खराब होण्याची भीतीच असते. म्हणून कोणतेही स्मार्ट डिव्हाईसला एक हाती वापरण्याचाच प्रयत्न करा.  
 
* हे देखील लक्षात घ्या -
*ऑनलाईन खरेदी करताना स्मार्ट डिव्हाइसच्या बद्दलची संपूर्ण माहिती ठेवा.
*स्मार्ट डिव्हाईस वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहावे.
*जर अ‍ॅप ने स्मार्ट डिव्हाईस चालत असल्यास वेळोवेळी टू- फेक्टर व्हेरिफिकेशन जरूर करा.