बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 14 डिसेंबर 2019 (12:49 IST)

WhatsAppचा मोठा निर्णय, 15 सेकंदात 100 संदेश पाठविल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल

एक मोठे पाऊल उचलून फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने बल्क संदेश पाठविणार्‍या खात्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी दर्शविली आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की ते मोठ्या प्रमाणात मेसेजेस पाठविणारी अशी व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद करेल. 
 
याशिवाय इन्स्टंट ग्रुप तयार करणार्‍यांच्या खात्यावरही कारवाई केली जाईल. तथापि, व्हॉट्सअॅपचा निर्णय सध्या फक्त व्हॉट्सअ‍ॅपच्या बिझिनेस अकाउंटसाठी आहे.
 
उदाहरणार्थ, जर पाच मिनिटांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप व्यवसाय खाते तयार केले गेले असेल आणि त्या खात्यातून 15 सेकंदात 100 संदेश पाठवले गेले असतील तर कंपनी त्या खात्यावर कारवाई करेल. कंपनी ते खातेही बंद करू शकते.
 
याशिवाय काही मिनिटांत डझनभर ग्रुप तयार करणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटनाही लक्ष्य केले जाईल. वास्तविक व्हॉट्सअॅपने स्पॅम संदेश तपासण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हा व्हॉट्सअॅप नियम 7 डिसेंबरापासून लागू झाला आहे.
 
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपने स्पॅम आणि बल्क मेसेजेस आळा घालण्यासाठी बल्क मेसेज फॉरवर्ड करणे थांबवले होते. अशा परिस्थितीत, वापरकर्ते एकाच वेळी केवळ पाच लोकांना संदेश पाठवू शकतात.