#MaharashtraWithShivsena चे ट्रेंडिग ट्विटरवर सुरु
सोशल मीडियावर सध्या #MaharashtraWithShivsena अशाप्रकारचं ट्रेंडिग ट्विटरवर सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापन करता आलेली नाही. भाजपाने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दाखविल्यानंतर शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली. शिवसेनेवर जनादेशाचा अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला. यानंतर लगेचच ट्विटरवरशिवसेना ट्रोल होऊ लागली आहे.
ट्विटरवर #ShivsenaCheatsMaharashtra असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला असून काही तासांत 20 हजारावर ट्विट करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मिम्स व्हायरल केले आहेत. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेस विरोधी, हिंदुत्वाबाबतची वक्तव्ये जोडून ती टाकली जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडीओही व्हायरल होऊ लागले आहेत. मात्र या हॅशटॅगला विरोध करण्यासाठी #MaharashtraWithShivsena अशा ट्रेंड सुरु झाला आहे.