मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (18:11 IST)

व्हॉट्सअॅपवर JioMart लाँच करण्यासाठी Meta, Jio यांनी हातमिळवणी केली

jjio meta whatsapp
तंत्रज्ञान कंपनी मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म यांनी मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर JioMart लाँच करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे रिलायन्स रिटेलचे ग्राहक व्हॉट्सअॅपवर किराणा सामान ऑर्डर करू शकतील.
 
या संदर्भात जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, WhatsApp वर JioMart ऑनलाइन खरेदीदारांना JioMart च्या किराणा मालाच्या यादीशी जोडेल. ग्राहक 'कार्ट'मधील वस्तूंसाठी पैसे देऊन या यादीतून वस्तू खरेदी करू शकतात.
 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या एजीएम (AGM) बैठकीत, ईशा अंबानीने ऑनलाइन किराणा ऑर्डरिंग आणि व्हॉट्सअॅप वापरून पेमेंट यावर सादरीकरण केले.
 
मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारतात JioMart सोबत आमची भागीदारी सुरू करण्यास उत्सुक आहे. WhatsApp वर आमचा हा पहिला 'एंड-टू-एंड शॉपिंग' अनुभव आहे. याद्वारे लोक आता थेट Jiomart वरून चॅटमध्ये किराणा सामान ऑर्डर करू शकतात.