मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (13:32 IST)

Xiaomi स्मार्ट बल्ब आणि तो देखील व्हॉईस कंट्रोल फीचर्ससह, इतकी आहे किंमत

Mi Smart LED Bulb (B22): Photo- mi.com

Mi Smart LED Bulb (B22) भारतात लॉन्च केले गेले आहे. हा भारतातील शाओमीच्या स्मार्ट होम अप्लायन्स लाईनअपचा भाग आहे. नावावरूनच कळत आहे की हा स्मार्ट बल्ब सामान्यतः वापरला जाणाऱ्या B22 बल्ब सॉकेट मध्ये फिट बसेल.
 
हे पॉलिकार्बोनेट आणि प्लास्टिक क्लेड ऍल्यूमिनियमने बनलेले आहे. हे 16 दशलक्ष रंग तयार करते आणि मोबाईल अ‍ॅप्सद्वारे नियंत्रित केलं जातं. त्याचबरोबर हे  Mi Smart LED Bulb (B22) गूगल आणि अलेक्सा सारख्या व्हॉईस असिस्टेंट्स सह काम करतं. भारतात याची किंमत 799 रुपये ठेवली आहे. आणि हे पांढऱ्या रंगाचे मिळेल. हे आपण Mi च्या ऑनलाईन स्टोअर वरून खरेदी करू शकता.
 
Mi Smart LED Bulb (B22) चे वैशिष्ट्ये : 
याची रेटेड पॉवर 9W आहे. आणि हा 950 lumens ची ब्राइटनेस देतं. हा स्टॅंडर्ड B22 बेस टाइप वापरतं. शाओमीचे म्हणणे आहे की याची लाईफ स्पॅन सुमारे 25,000 तासांची आहे. Mi स्मार्ट LED चे रेट इनपुट 0.07A वर 220V ते 240V आहे. याला गुगल किंवा अलेक्सा व्हॉईस असिस्टेंट कंट्रोल द्वारे नियंत्रित केले जाऊ शकते.
 
हा 16 दशलक्ष रंग तयार करतं. वापरकर्ते अँड्रॉइड आणि IOS वर उपलब्ध असलेले मी होम अप द्वारे आपला आवडीचा रंग निवडू शकतात. कलर टेंपरेचर साठी ऍडजस्ट्मेंट रेंज 1,700K आणि 6,500K च्या मध्ये असणार. मोबाइलला कनेक्ट करण्यासाठी हे स्मार्ट बल्ब Wi-Fi 802.11 b/g/n चे वापर करतो.