1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (12:17 IST)

निर्यातबंदी नंतरही कांदा रडवतोय

onion price in Maharashtra
निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याच्या दरात कमी येईल अशी शक्यता वर्तवली जात असताना कांदाचा भाव काही कमी होताना दिसत नाहीये. किरकोळ बाजारात कांदा दरात तेजी निर्माण झाली आहे. 
 
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. जुन्या कांद्याची आवक अपुरी पडत असल्याने कांदा दरात तेजी निर्माण झाली आहे.
 
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते परंतू दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. 
 
महाराष्ट्रातील कांद्याला देशभरातून मागणी आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात कांद्याच्या दरात प्रतिकिलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या जुन्या कांद्याची विक्री 40 ते 45 रुपये दराने केली जात आहे. कांद्याची आवक कमी झाल्यास कांद्याचे दर 50 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.