मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (17:26 IST)

मुलांच्या चांगल्या भविष्याची तरतूद करण्यासाठी येथे गुंतवणूक करा

आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असणं प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असतं. या स्वप्नाला साकार करण्यासाठी पैशांचे फार महत्त्व आहे. पैसे कमावायचे प्रत्येकाला वाटते. पण कित्येकदा आर्थिक नियोजन करून सुद्धा आपली उद्दिष्टे साध्य करता येत नसतात. अश्या परिस्थितीत आम्ही आपल्याला तीन सरकारी योजनांबद्दल सांगत आहोत, जिथे गुंतवणूक करून आपल्याला फायदाच होणार आणि आपल्या मुलांचे भविष्य देखील सुरक्षित राहील. 
 
* सार्वजनिक भविष्य निर्वाह विधी (पीपीएफ) -
पीपीएफ मध्ये गुंतवणूक सर्वात जास्त सुरक्षित आहे. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत पीपीएफ मधील केली जाणारी गुंतवणूक आणि त्यावरील व्याज वर करातून सूट देण्यात येते. या योजनेची कालावधी 15 वर्षे आहे जी प्रत्येक पाच वर्षांनी वाढवता येते.  
 
पीपीएफ वर या पूर्वी 7.9 टक्के व्याज मिळत असे जे आता 7.1 टक्के खाली आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक मंदीला लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे की या योजनेत किमान 500 रुपया पासून जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. 

* सुकन्या समृद्धी योजना - 
लघु बचत योजना अंतर्गत सरकारकडे सुकन्या समृद्धी नावाची एक विशेष योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना रिटर्न मिळतो आणि ते आपले आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकतात. ही योजना भारत सरकारची "बेटी बचाओ बेटी पढाओ" अंतर्गत राबविली जाणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. 
 
या योजना अंतर्गत मुलीच्या नावे 15 वर्षापर्यंत वार्षिक 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाईल. त्याच वेळी आर्थिक वर्षांमध्ये किमान ठेव रक्कम 250 रुपये आहे. या योजनेचा लाभ आपल्याला मोठ्या प्रमाणात होणार. ही रक्कम आपल्याला आपल्या मुलीचा शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी फायदेशीर ठरेल. जर का आपल्या मुलीचे वय वर्ष 10 आहे तर आपण सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडू शकता. गुंतवणुकीत आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत देखील उपलब्ध आहे.
 
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूकदारांना वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळतं. हा व्याजदर भारत सरकार दर आर्थिक वर्षात निश्चित करते. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यावर मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत किंवा वयाच्या 18 व्या वर्षानंतर तिचे लग्न होईपर्यंत चालवता येऊ शकते.
 
* इक्विटी म्युच्युअल फंड - 
इक्विटी म्युच्युअल फंड बहुधा त्यांचे पैसे इक्विटी किंवा स्टॉकमध्ये गुंतवतात. या म्युच्युअल फंड योजनेत कॉपर्स चा 65 टक्के भाग इक्विटी, भारतीय स्टॉक्स, टॅक्सेशन आणि इक्विटी म्युच्युअल फंडाशी निगडित गुंतवणुकीत गुंतवणूक करतात. हेच कारण आहे की आंतरराष्ट्रीय निधीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यावर देखील इक्विटीच्या श्रेणीत ठेवत नाही. 
 
इक्विटी म्युच्युअल फंड कोणत्याही इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा दीर्घ मुदतीत जास्त रिटर्न देतात. म्युच्युअल फंडात आपण सिस्टेमॅॅटिक इन्वेस्टमेंट प्लान (SIP) च्या मार्फत हफ्त्यात गुंतवणूक करू शकता. मुलांच्या गरजेनुसार 10 वर्षानंतर पेश्यांची गरज भासल्यास, गुंतवणूक लार्जकॅप फंडात करणं जास्त चांगले आहे.