सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (15:46 IST)

मुकेश अंबानी यांचा Jio च्या संचालक पदाचा राजीनामा, मुलगा आकाश अंबानी कंपनीचा नवा अध्यक्ष

मुकेश अंबानी यांनी जिओ टेलिकॉमच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मुलगा आकाश अंबानी जिओचा नवा अध्यक्ष बनला आहे. बाजार नियामक सेबी (SEBI) ला दिलेल्या माहितीत, रिलायन्स जिओने सांगितले की बोर्डाची बैठक 27 जून 2022 रोजी झाली होती. यामध्ये रिलायन्स जिओच्या बोर्ड मेंबरने आकाश अंबानी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीला मंजुरी दिली आहे. मुकेश अंबानी यांनी 27 जूनपासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.