शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (09:22 IST)

मुंबईकरांच्या मदतीला ‘मुंबई वेदर अ‍ॅप’

मुंबईकरांना आपल्या स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर पर्जन्यवृष्टीची अचूक आकडेवारी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या भागात किती पाऊस झाला आहे, त्यानुसार प्रवासाचे नियोजन करता येईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम)च्या माध्यमातून ‘मुंबई वेदर अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपमुळे मुंबईकरांना पावसाची स्थिती कळणार आहे.
 
या अ‍ॅपच्या नव्या व्हर्जनवर भारतीय हवामान खात्या ने(आयएमडी)संकलित केलेली पावसाची ताजी माहिती दर 15 मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि वार्‍याची स्थिती या वातावरणातील घटकांचीही माहिती या अ‍ॅपवर मिळणार आहे. वातावरणाची अचूक महिती प्राप्त होण्यासाठी उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रांचेही विश्‍लेषण करण्यात येणार आहे. या अ‍ॅपमुळे नागरिक अधिक सतर्क राहून त्यांना त्यादृष्टीने सज्ज राहता येईल, असे भारतीय हवामान खात्यातील अधिकार्‍याने म्हटले आहे.