शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (17:49 IST)

आता मित्र आपसात Netflix पासवर्ड शेअर करु शकणार नाही, कंपनीचा नवा नियम

जर आपण देखील त्या लोकांपैकी एक आहात जे पासवर्ड शेअर करुन एकाच नेटफ्लिक्स अकाउंटचा वापर करत असाल तर आता आपण अडचणीत पडणार आहात. पॉप्युलर OTT (ओवर-द-टॉप) प्लेटफॉर्म Netflix एका फीचरची टेस्टिंग करत आहे, ज्याने व्यूअर्सला वेरिफाय करावे लागेले की ते अकाउंट होल्डरसह एकाच घरात राहतात. कंपनीने सांगितले अशाने पासवर्ड शेअरिंग थांबवता येईल.
 
न्यूज एजेंसी रॉयटर्सप्रमाणे काही नेटफ्लिक्स यूजर्सला कंपनीने हे कन्फर्म करण्यसाठी सांगितले आहे की ते अकाउंट होल्डरसह राहतात वा नाही. कंपनीने यूजर्सला मेसेज आणि ईमेलद्वारे संपर्क केला. सध्या तरी व्यूअर्स वेरिफिकेशन केल्याविना नेटफ्लिक्स बघू शकतात परंतू पुढील वेळेस नेटफ्लिक्स ओपन केल्याने असा मेसेज येऊ शकतो आणि आपल्याला नवीन अकाउंट उघडावं लागू शकतं.
 
स्क्रीनवर येतोय हा मेसेज
नेटफ्लिक्स चालवताना स्क्रीनवर मेसेज येत आहे ज्यावर लिहिले आहे की 'जर आपण या अकाउंट होल्डरसोबत राहत नसाल तर आपल्याला नेटफ्लिक्स बघण्यासाठी आपल्या खात्याची गरज आहे.' नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने सांगितले की 'या टेस्टद्वारे हे सुनिश्चित केले जाई, की नेटफ्लिक्स अकाउंटचा वारप तेच लोक करत आहे ज्यांना परवानगी आहे.' नेटफ्लिक्सच्या सेवा अटींमध्ये म्हटले गेले आहे की कोणत्याही एका अकाउंटचा वापर एकाच घरात राहणारे लोकंच करु शकतात.
 
कंपनीचा नवीन प्लान
उल्लेखनीय आहे की नेटफ्लिक्सने अलीकडेच भारतात Mobile+ नावाचे नवीन प्लान लॉन्च केले आहे. याची किंमत 299 रुपये इतकी आहे. सध्या याची टेस्टिंग सुरु आहे. Netflix Mobile+ प्लान अंतर्गत यूजर्स नेटफ्लिक्स कंटेंट HD क्वॉलिटीमध्ये बघू शकतील. साधारण मोबाइल प्लान सारखेच यात देखील एका वेळी 'वन स्क्रीन' ची बंदी आहे. प्लानमध्ये यूजर्स कंटेंटला कंप्यूटर किंवा लॅपटॉपवर बघू शकतात.