शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 17 जानेवारी 2019 (16:06 IST)

व्हॉट्‌सअ‍ॅपवर ग्रुप कॉलिंगशी संबंधित नवे फीचर

जगातल्या सर्वात मोठ्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप- व्हॉट्‌सअ‍ॅपवर लवकरच ग्रुप कॉलिंगशी संबंधित नवे फीचर येणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ग्रुप व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर आणले होते. मात्र या कॉलिंगची प्रक्रिया थोडी किचकट होती. आता ती सोपी करण्यासाठी व्हॉट्‌सअ‍ॅपने एक विशेष बटणच अ‍ॅड करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
ग्रुप कॉलिंगसाठी व्हॉट्‌सअ‍ॅपमध्ये एक कॉल बटण दिले जाणर आहे. आयफोन यूजर्सना हे बटण यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहे.