रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:45 IST)

यंदा आंबा सीझन लांबणीवर जाणार

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झाडांना मोहोर न आल्याने आंबा सीझन लांबणीवर जाणार आहे. मोहोर न आल्याने हा सीझन लांबणीवर जाणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होणारा हापूस आंब्याचा सिझन या वर्षी मार्च महिन्यात जाणार आहे. सध्या फक्त २० ते २४ पेट्या आंबा एपीएमसी मार्केटला येत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे. ही थंडी लांबल्यास याचा परिणाम आंब्याच्या झाडावर आलेल्या मोहोर आणि लहान फळावर होऊन ते गळण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकामध्ये आंब्याचे पिक चांगलं आलं आहे.