बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जानेवारी 2019 (09:17 IST)

राज्यात थंडीचा जोर ओसरला

राज्यात थंडीचा जोर ओसरतोय. मुंबईचे किमान तापमान सोमवारी १५ अंश नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.२ अंश नोंदविण्यात आले.
 
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.